Saturday, June 20, 2009

चिंधी !!

ब्रम्हदेवाने स्रुष्टी बनवली. चार वर्ण बनवले. वेल, त्याने अनभिद्न्यपणे आणखी एक प्रजाती बनवली. माणसांचा हा प्रकार कालातीत आहे. तो सर्व जाती धर्मांच्या पलीकडचा आहे. तो प्रकार सगळीकडे, सर्व वयोगटामधे आढळतो. तो प्रकार म्हणजे "चिंधी".

वर्णन:

चिंधी लोक चार चौघांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. ते हुशार किंवा ढ देखील असू शकतात. त्यांचा चिंधीपणा चिंधी संगत असली की सुरू होतो. त्यामुळे त्यांच वर्णन करणे कठीण आहे. परंतु सोदाहरण हे दाखवून देता येइल. काही लक्षणे देखील देता येतिल.

१. ह्या लोकांची नैसर्गीक भाषा शुद्ध असते. परंतु चिंधी संगत येताच ती शिवराळ, cryptic बनते. उदा. "माझा computer बिघडलाय" = "माझ्या डब्याची ची लागली आहे, त्याच्या गांडीत घुसलेल्या wire ने शॊट दिला आणि त्याचा कोळसा झाला"
२. विचित्र प्रकारचे फ़ाल्तू jokes मारण्याकडे त्यांचा कल असतो. उदा. "my father is at dadar" - राजेंद्रनाथ, हिंदी चित्रपट अभिनेता.
३. चांगल्या सुशिक्षीत कुटुंबात जन्म होउनही, चांगल शिक्षण मिळून देखील मिथून च्या पिक्चर सारखे बी-ग्रेड पिक्चर बघण्याकडे, आणि त्यातल्या विसंगतिंवर फ़िदी-फ़िदी हसणे अशा त्यांच्या सवयी असतात.
४. दिसण्यावरून तुम्हाला वाटणार नाही की ही व्यक्ती "लिबर्टी", "रतन" अशा थेटरात जाउन अश्लील सिनेमे बघते.
५. हे लोक जेवताना गलिच्छ किळसवाणे बोलतात आणि हसतात.
६. अस्वच्छ ठीकाणी जंक फ़ूड खाणे यांना आवडते.
७. स्वत:च्या आवडींच्या बाबतीत हे लोक अतिरेकी असतात. उदा. "रोज बेडेकरची मिसळ खाणे, किमान १ वाटी एक्स्ट्रॊ रस्सा पिणे".
८. हे लोक दिवाळीच्या दिवशी देखिल अश्लील sms पाठवू शकतात. पूजेमधे असताना देखील अशा sms ला रीप्लाय करू शकतात.

एक महत्वाची गोष्ट: मुली देखील चिंधी असू शकतात (मला "गुंडा", "लोहा" हे चित्रपट बघायला सांगणारी एक मुलगी होती).

आणि हो, चिंधी असणं गैर नाही.

मी विविध क्षेत्रातील चिंधी लोकांची उदाहरण नमूद करतो (बेंचमार्क समजा यान्ना हव तर!!)

१. सगळ्यात पहीला चिंधी: 

"महर्षी नारद"
बाप ल्हय जबरा देव असूनही "नारायण" नावच्या दुसयाच कोणाची भक्ती करणारा, अप्सरांशी flirt करणारा, विविध बातम्या देऊन इंद्राची मारणारा, ३ ठीकाणी उड्या मारत फ़िरणारा हा (माणूस ?) जगातला सगळ्यात पहिला चिंधी होय.

कुशल कवी, ड्न्यानी म्हणून त्याने नाव कमवल खरं, पण त्याचं हे टॅलंट ओळखणारे आम्हीच पहीले.

आणखी काही नावे:

२. लक्ष्मीकांत बेर्डे
आठवा- 
"अरे सारखं सारखं त्याच झाडावर काय!!"
"ए गणपती !!"
"धनंजय माने इथेच रहातात का ?"

३. राजेंद्रनाथ
४. अर्षद वारसी
५. मिथून
६. दादा कोंडके
७. जीम कॅरी

तुमच्यातही एखादा चिंधी लपलेला असेल. त्याला वाव द्या आणि त्याचं इथे लिहिलेल्याव्यतिरिक्त एखादं लक्षण/नाव असेल तर मला कळवा.

कौ.

5 comments:

Nishikant said...

haha too good ! especially the laxmikant berde's 1st comment ! 'parat parat tyach zaada var kay'..
I think shakti kapoor, salman khan (especially after his aaaaii aooo [one of the shahu guy used to do it before every comments] started!) also belong to these categories

koustubh kulkarni said...

धन्यवाद निशु ... यादीमधे भर टाकल्याबद्दल !!
शक्ती कपूर हा अश्लाघ्य आणि चिंधी अशा दोन्ही प्रकारांमधे मोडतो.

kaushik said...

pratyek manasat ek चिंधी dadala ahe..to kadhitari baher yetoch..ani Punekaran madhye tar to bharalelach ahe...hahahahhaa

koustubh kulkarni said...

yatlya kahi goshti tuzyakade baghun lihilya ahet.

संदीप said...

आपला राहूल महाजन!