Saturday, May 10, 2008

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (उत्तरार्ध)

(पूर्वार्ध इथे वाचावा, पात्र आणि घटना काल्पनीक)

रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूच पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच.

इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून. आज कसेरंग खेळयचे हे त्याने आधीच ठरवलेल होत. तसे खीशात ३०-३५ रुपयांचे रंग आणले होते.२ दिवसापुर्वीच त्याने कटींग केली होती. केसं कलर पण केली होती थोडी. २ महिन्यांपुर्वीइशल्या बरोबर जिम स्टार्ट करून थोडी बॊडीबिल्डिंग केली होती. गेल्या वेळी पोरांनी उचलून हौदात टाकला होता त्याला ... य धूतला होता !! आजचे कपडे पन आधीच ठरवलेले होते.बॊडी दिसेल याची काळजी त्याने घेतली होती. फ़ुल्ल आवरून आला होता तो.(पावडर पण लावली होती थोडी).

तेवढ्यात मागून त्याची आई आली आणि आपल्या निरमा आणि नारळाच्या काथ्यांनी भांडी घासून खरखरीत झालेल्या हाताने र्हावल्याला फाडदिशी ओढली. त्याचे कान गरम झाले.

"पयला घरी चल ह्यंद्र्या .... इचकट कार्ट .... सणावारी भांडण करतय"
"हात्तीच्यायला कसली वोढली ... लय बेक्कार .. ह्यॆ ह्यॆ ह्यॆ" .. कोणीतरी आपले reflexes दाखवले.आणखी ४-५ पोट्टी हसली. र्हावल्या ला आयशी चा लय राग आला.
"दद्या ला सांग ... आईवरून शिवी दिली त्याने मला" .... दादा .. सख्खा भाऊ !!

इतक्यात इकडे रंगपंचमीचा एकच गलका उडाला. धडाक्यात सगळ्यांनी एकमेकांना रंगवायला सुरुवातकेली. सर्वांच्या मनात "मी पन आन्नाला लावनार ... आ !" अशी प्रेमभावना दाटली. प्रत्येक कार्यकर्ताआन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुक करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा उर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढ्नार" .. अस तर त्या मायेला वाटल नसेलना !! सत्या ने रंग लावल्यावर अन्ना ने त्याला मिठी मारली. सत्या पुन्हा लाडात. पिच्या ला खुपलं हे, पण त्यानेदु:ख गिळून टाकल. आन्ना नंतर दोन काची ची दोन बोट त्याने Mercedes (बरं एस्टीम ... खूश ??)ला पण लावली. इशल्या-गन्या गॆंग ने नेहेमी प्रमाणे अक्रस्ताळेपणा आणि अगाचोरपणा सुरू केला. शेट्टी रंगल्यावर फ़ार ओंगळ दिसत होता (च्ययला आपण बरे दिऊन काय दिवे लावले ... त्याची .. असो ॥)। ... तर रंगपंचमी थाटात साजरी झाली.

(समाप्त)

2 comments:

koustubh kulkarni said...

मिसळपाव (www.misalpav.com) या संस्थळावर ही लेखमाला प्रसिद्ध झाली होती.
तेथील वाचकांचे काही दिलखुलास प्रतिसाद:

हा हा हा
केसं कलर केली होती.. एकदम चपखल..
एकूणच पुण्यातल्या राजकीय बोलीचा अभ्यास आपला लैच भारी दिसत आहे, पण भाग थोडे तुटक वाटले. जरा जास्त लिहा की.
--पुण्याचे पेशवे

हा...ण. तिच्याआयला!!!!
***आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढनार" ..
एकदम मुंडक्यावरच टाकलं की हो :))
चालुद्या.
--पु.ले.शु.

सही
रंगपंचमी रंगतदार!!
--यशोधरा.

छान चाललीये रंगपंचमी
***"प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढणार."

ह्म्म्...छान चाललीये रंगपंचमी..पण थोडक्यातच आटोपली असे वाटतय. जरा अ़जून लिहायला हवे / वाचायला मिळायला हवे होते असे वाटले. किन्वा २ भागात लिहिण्यापेक्षा एकच मोठा भाग केला असता तर मजा आली असती. २ भागांमुळे गोष्टीची लिन्क तुटल्यासारखी वाटली. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांची भाषा , त्यांचे राहणीमान, बोलण्यावागण्याची पध्दत अचूक मांडली आहे.
--वेलदोडा.


मस्त!
लिहिलं आहे, अजूनही लिवा!

--आपला,
--तात्याआन्ना.

... said...

i came here and clicked your google ad.. hope that helped..[:)]