Saturday, April 19, 2008

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

(पात्र आणि घटना काल्पनीक.)

योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो. अचानक रस्त्यावर गर्दी जमली. मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता. आई शप्पथ !!) मधुन जणू त्यांच्या स्वागतासाठी १०० पत्रकार camera घेउन वाट बघत आहेत अशा थाटात अवतरले. एकदम रिन सफ़ेदी वाल्या कुर्त्या पायजम्यात. पन स्वागतासठी पिच्या शिवाय कोनीच नस्ल्याने थोडे हिरमुसले. त्यांचा हा चेहेरा पिच्याच्याने बघवला नाही. पिच्याने शिट्टीमारली आनि नव-तरून मंडलाचे कार्यकर्ते जे रंगपंचमी च्या तयारीत गुंतले होते ते हजर झाले. आन्नाचा चेहेरा खुलला. थोडा लाल पन झाला.आन्नाने अपुलकी ने पिचु आनि विकि ला मिठी मारली. त्यांना पन थ्वडा भाव वाढल्या सारखं वाटल. मग चालताना त्यांची कोपरं मागे गेली आणिछाती २ इंच पुढे आली आणि ती झुलवत ते रंगपंचमीच्या set वर गेले. चालतानी आन्ना ने खांद्यावर हात ठेवल्याने सत्या पन थ्वडा लाडातआला. हळु हळु गर्दी वाढू लागली. "ऒ अंत्या .... हिकड कसा काय !!! अ गन्या ... यड्या ... हा हा हा ... लय भारी यड्याआ.... फ़ुल्ल खेळ्नार यड्या .... आयला ह्यो बघ .... ह्या ह्या ह्या" अशा संवादांनी गल्ली गजबजू लागली. पांडरा शर्ट-प्यांट, काळे चकचकीत बूट,लठ्ठ बोटांमधे जाड अंगठ्या, गळ्यात "पच्चास तोला" माळा, काळा ग्वागल, भारदस्त काळ्या जाड मिशा अशा वेशात राजू शेट्टी (काळा कभिन्न रंग, ४'९" उंची, पोट पुढे, बायको मात्र त्यामनाने ... असो ... ) हे व्यक्तिमत्व फोन वर बोलत प्रकट झालं. गर्दितुन मग तो मुद्दाम गर्दिपासून लांब गेला. फोन वर कोनाला तरी ४ शब्द (!@@#%#**$@) सुनावले आनि गर्दित परत आला. त्याचे ४ शब्द ऐकून सत्या आनी आंत्या ला ल्हई कवतीक वाटलं. तेवढ्यात रफ़ीक शेख आले आनि लोकांना सर्व-धर्म-समभावाच्या ओका-या होऊ लागल्या. क्वांग्रेस मधून मनसेत जाणार होते पन अन्ना ने ओढून आनलं त्यांना हिकडं. काही दिवसांपुर्वीच शिवसेनेतुन switch मारलेल्यांना काही हे पटल नाही. पन पक्शशिस्तिपरमाने त्यांने शेखांना मिठी मारली आनी रंगपंचमी + ईद च्या शुभेच्छा दिल्या. शेखांनी पेशल मटन बिर्यानी चं अश्वासन दिल्यावर मात्र त्यन्च्या तोंडाला पानी सुटलं आनि त्यांनी एक आवंढा गिळला.

(क्रमशः)

3 comments:

Unknown said...

he swarachit ahe ka????????tu itake sunder lihu shaktos??? aplyat he laplele gun ahet he mahit nawhate???? ya peksha kavyatmak marathi mi lihushakat nahi...thats really good...keep writting eventually we can publish a book

koustubh kulkarni said...

Yes Mam .. This is magnum opus by koukya. 100% swarachit, based on some real characters in our galli. And "kavyatmak" Marathi? guess you want to say "alankarik". Best word which describes this is "Upahasatmak vinodi" (sarcastic comedy). Anyway thanks.Gud that you liked it.

Unknown said...

Are Jabri
kup mast lihal ahe
all the best